महम्मद शमीला धमकी   

भावाने पोलिसांत केली तक्रार

नवी दिल्ली : भारताचा वेगवान गोलंदाज मोहम्मद शमीला आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. मोहम्मद शमी हा सध्याच्या घडीला आयपीएल खेळत आहे. आयपीएल खेळत असताना मोहम्मद शमीला ही धमकी देण्यात आली असून त्याने आता पोलिसांकडे धाव घेतली.
 
मोहम्मद शमी हा सध्याच्या घडीला सनरायझर्स हैदराबादच्या संघाकडून आयपीएलमध्ये खेळत आहे. आयपीएलमध्ये हैदराबादच्या संघाबरोबर असताना मोहम्मद शमीला एक ईमेल आला आहे. या ईमेलमध्ये मोहम्मद शमीला जीवे मारण्याची धमकी देण्यात आली आहे. त्यानंतर मोहम्मद शमीने उत्तर प्रदेशमधील अमरोहा पोलसांची संपर्क केला आहे. त्यानंतर याबाबत आता तपास सुरु करण्यात आला आहे.
 
मोहम्मद शमीला कोणी ना कोणी तरी टार्गेट करत असल्याचे आतापर्यंत पाहायला मिळाले आहे. मोहम्मद शमी जेव्हा दुबईमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळत होता, त्यावेळी त्याला भारतामधील मौलानांनी टार्गेट केले होते. मोहम्मद शमी हा मुस्लीम धर्माचा अनादर करत असल्याचे त्यांनी म्हटले होते, कारण त्यावेळी रोजा सुरु होता. त्यावेळी मोहम्मद शमी भारताकडून खेळत असल्यामुळे तो सराव करत होता. सराव करत असताना त्याचा एनर्जी ड्रिंक्स पितानाचा फोटो व्हायरल झाला होता. त्यानंतर भारतामधील मौलाना यांनी मोहम्मद शमीवर जोरदार टीका केली होती. हे मौलाना फक्त मोहम्मद शमीपर्यंच थांबले नाहीत, तर त्यांनी त्यानंतर मोहम्मद शमीच्या मुलीवरही टीका केली होती. यावेळी मोहम्मद शमीच्या पाठिशी संपूर्ण देश उभा राहीला होता. पण शमीने याबाबत काहीच म्हटले नव्हते आणि शांतपणे त्याने हे प्रकरण हाताळले होते. आता मोहम्मद शमीला आता जीवे मारण्याची धमकी देण्यात आली असल्याचे समोर आले आहे.
 
मोहम्मद शमीला ईमेलद्वारे धमकी दिली आल्याचे आता समोर येत आहे. पण याबाबत अमरोहा पोलिसांनी अधिकृत पत्रक काढलेले नाही किंवा कोणतीह माहिती दिलेली नाही. त्यामुळे आता अमरोह पोलिस मोहम्मद शमीच्या प्रकरणाबाबत नेमका काय निर्णय घेते, याकडे आता सर्वांचे लक्ष लागलेले असणार आहे. 

Related Articles